देवेंद्र फडणवीसांवर पक्षानं सोपवली मोठी जबाबदारी; बजावणार चोख कामगिरी !

 

रजत आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्य सरकारचा अडचणीत आणण्याचे काम करणाऱ्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज्यात भाजपचं नेतृत्त्व करणारे फडणवीस गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

भाजप पक्ष नेतृत्त्वानं गोवा विधानसभेचे प्रभारी म्हणून फडणवीस यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी सुद्धा बिहार विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी उत्तम कामगिरी केली आहे. २०२० मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपनं ७० हून अधिक जागा जिंकत विवधकांचा दणदणीत पराभव केला होता. तसेच संयुक्त जनता दलासह सत्ता कायम ठेवली. त्यामुळे आता गोव्यात फडणवीस काय करणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

गोवा विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. तसेच गोवा बराच काळ अस्थिर राहिलं आहे. मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्त्वाखाली गोव्याला स्थिर सरकार मिळालं. मात्र त्यांच्या निधनानंतर गोवा भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला गोव्यात १३ जागा मिळाल्या. त्यांच्या ८ जागा कमी झाल्या होत्या. काँग्रेसनं १७ जागा जिंकल्या. मात्र काँग्रेसपेक्षा कमी जागा जिंकूनही भाजपनं छोट्या पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केलं.

Team Global News Marathi: