“देशात काँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची आघाडी होऊच शकत नाही”

 

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला आहे. विरोधी पक्षांकडून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर अनेक गंभीर आरोप होत आहेत.ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे जम्मूत आले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी संजय राऊत हे जम्मूला आले आहेत.

तसेच यावेळी त्यांनी शिवसेना जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘देशात काँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची आघाडी होऊच शकत नाही’, असेही संजय राऊत यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुनावले आहे.”एकंदरीत तुम्ही पाहिलं असेल तर भारत जोडो यात्रेची चांगली वातावरण निर्मिती आहे. पक्ष म्हणून नाही पण देशात चांगला संदेश जात आहे. पठाणकोटला हजारो तरुण मशाली घेऊन निघाले होते. मशाली काय काँग्रेसचे चिन्ह नाही.

ते शिवसेनेचे चिन्ह आहे. मलाही भरून आले. देश जागवण्यासाठी सर्वांना हातात मशालच घ्यावी लागते. यात्रा जरी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात असली तरी सर्वत्र काल संध्याकाळनंतर हजारो मशाली पेटलेल्या दिसल्या. पाऊस असला तरी आम्ही त्या यात्रेत सहभागी होतोय”, असे संजय राऊत म्हणाले आहेत. शिंदे गटाच्या नेत्यांनी राऊत यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला होता. त्याचाही राऊतांनी समाचार घेतला आहे.

Team Global News Marathi: