कोल्हापूर पुन्हा लॉक डाऊन करण्याची व्यापाऱ्यांची मागणी

कोल्हापूर पुन्हा लॉक डाऊन करण्याची व्यापारीवर्गाची मागणी

कोल्हापूर जिल्हयात तसेच ग्रामीण भागात कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होतं असलेली पाहून पुन्हा एकदा जिल्हयात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी व्यापारी संघटनेकडून केली जात आहे. याबाबत संघटनेकडून प्रशासनाला निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या पातळीवर लॉकडाऊनबाबत चाचपणी करत आहे तसेच येत्या दोन दिवसात यावर निर्णय होऊ शकतो.

कोल्हापूर जिल्ह्यात आणि विशेषतः ग्रामीण भागात रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे संसर्गाचा धोका अधिक प्रमाणात निर्माण होऊ शकतो. यासाठी आजरा तालुक्यातील व्यपाऱ्यांनी पुढाकार घेत १० दिवसाचा कडक लॉकडाऊन पाळण्याच्या निर्णय घेतला आहे.

आज पर्यंत कोल्हापुरात २३ हजार १०३ कोरोना रुग्ण आढळले असून एकूण ६९९ जणांचा मृत्यू झालेला आहे. आज कोल्हापुरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अधिक धक्कादायक आहे.

खुनासहित दरोडा, मोका गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी पाठलागानंतर जेरबंद

ग्लोबल न्युज नेटवर्क: