महाभारताचे “नऊ सार सूत्र” प्रत्येकाच्या जीवनात उपयुक्त ठरतील नक्की वाचा

महाभारताचे “नऊ सार सूत्र” प्रत्येकाच्या जीवनात उपयुक्त ठरतील नक्की वाचा

१) “जर आपण मुलांच्या चुकीच्या मागणीवर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल” -कौरव.

२) “तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील.”-कर्ण.

३) “मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल.”- अश्वत्थामा.

४) “कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल.” -भीष्म पितामह.

५) “संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते” -दुर्योधन.

६) “विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मुद्रा, मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते.”-धृतराष्ट्र.

७) “मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे.” -अर्जुन.

८) “प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही.”- शकुनी.

९) “नीति, धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही.” -युधिष्ठिर.

जर या नऊ सूत्रांकडून धडा घेणे शक्य नसेल तर पुढे महाभारत होणे निश्चित आहे.

जो इतरांना संपविण्याची तयारी करतो, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो व संपतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे.

माणसाला दुसऱ्याची वाट लावता-लावता स्वतःची वाट केव्हा लागते, हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा, स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा, वाट दाखवण्याचे कार्य करा.

“माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकती वरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो . धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना. कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही.”

आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा.

स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या.

🙏पटलं तर लाईक जरूर करा 🙏

ग्लोबल न्युज नेटवर्क: