दगडफेक आणि काठीने हल्ला करत नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड

 

भोपाळ | मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून राजकीय ववतारां तापले आहे. भोपाळ शहरातील चौकात असलेल्या माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची काही लोकांनी तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. सदर व्हिडिओ शेअर करताना कमलनाथ यांनी लिहिलं, “हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील आहे. ज्यात काही समाजकंटक देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची विटंबना करताना दिसत आहेत. ही घटना अत्यंत निंदनीय आहे.” व्हिडिओमध्ये दिसतं, की काही समाजकंटक नेहरूंच्या पुतळ्यावर काठीने हल्ला तसंच दगडफेक करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार पोलिसांनीही या घटनेची दखल घेतली आहे. सतना शहरातील सह जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धवरी चौकात ही घटना घडली आहे. व्हिडिओमध्ये पुतळ्याची तोडफोड करणारे उपद्रवी शिवराज सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. तसंच ते जवाहरलाल नेहरूंच्या पुतळ्यावर लाठीमार आणि दगडफेक करत होते सध्या या घटनेप्रकारानी काही लोकांना ताब्यात घेऊन पोलीस पुढील तपास करत आहेत.

Team Global News Marathi: