देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही, केंद्र सरकारची माहिती

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोना लसीकरणाच्या कामाला वेग आला आहे. तसेच कोणत्याही राज्यात कुठल्याही लसीचा तुटवडा नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी दिलेली आहे.

अमेरिकेने लागू केलेल्या नव्या नियमांनुसार लस निर्मितीसाठी उपयुक्त असलेल्या कच्चा मालावर निर्बंध आल्यामुळे लस निर्मितीमध्ये अडचणी येत आहेत असे सिरमने केंद्र सरकारला कळविले होते, तसेच या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली होती.सरकारने वेळीच दखल न घेतल्यास करोना लसीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असंही सीरमने पत्रात म्हटले होते.

देशात सध्या कुठल्याही राज्यात करोना लसीचा तुटवडा नाही, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण म्हणाले. तसंच लसीची किंमत कमी करण्याबाबत कंपन्यांसोबत पुन्हा चर्चा करण्यात येत आहे. आम्ही सांगितलेली किंमत ही लक्षणीयरित्या कमी आहे, अशी माहिती राजेश भूषण यांनी दिली. सीरम इन्स्टिट्यूटची करोनावरील कोविशिल्ड ही लस आता २०० रुपयांहून कमी किमतीत मिळेल. सर्व कर वगळून एका डोसची किंमत २०० रुपयांहून कमी असेल, असं राजेश भूषण म्हणाले.

Team Global News Marathi: