अद्यापही मतमोजणी सुरुच, अमेरिकेतील निवडणुकीबाबत उत्सुकता कायम

वॉश्गिंटन: अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणूक पार पडली असून आता त्याची मतमोजणी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या मतांमध्ये जो बायडेन हे त्यांचे प्रतिस्पर्धी ट्रम्प यांच्यावर बढत मिळवत असल्याचं दिसून येत आहे. डेमोक्रॅटचे उमेदवार बायडेन  यांना आतापर्यंत २२३ इलेक्ट्रॉरल मते मिळाली आहेत, तर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांच्या खात्यात २०३ मते आहेत. अमेरिकत राष्ट्राध्यक्ष पदासाठी २७० हा बहुमताचा आकडा आहे.

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. त्याचा गंभीर परिणाम देखील अमेरिकेवर झाला आहे. याच प्रकरणी ट्रम्प यांच्याविरोधात विरोधी पक्ष नेहमीच हल्ला चढवत आला होता. 

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आता जवळजवळ २४ तास उलटून गेलेले असताना देखील अद्यापही नेमका निकाल समोर येऊ शकलेला नाही. कारण अद्यापही बॅलेट मतमोजणी ही सुरुच आहे. त्यामुळे स्पष्ट निकालासाठी अधिक वेळ वाट पाहावी लागू शकते. मात्र, असं असलं तरीही डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांनी आपणच विजयी असल्याचा दावा केला आहे. 


अमेरिकेच्या उपाध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिसचे काका आणि इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अॅण्ड अ‍ॅनालिसिसचे माजी संचालक जी. बालाचंद्रन म्हणाले, ‘मला आशा आहे की बायडेन या निवडणुकीत विजयी होतील. फ्लोरिडा राज्य महत्वाचे आहे. या राज्यात ट्रम्प हरले तर त्यांना अध्यक्षपदावरून जावे लागेल. ट्रम्प जिंकले तरी बायडेन यांना काही हरकत नाही. कारण ते इतर राज्यातही जिंकू शकतात.

बायडेन यांचा विजय होईल असा तज्ज्ञांचा अंदाज 

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, बायडेन यांनी ८९ आणि ट्रम्प यांनी ७२ ‘इलेक्टोरल कॉलेज व्होट’ जिंकले. तज्ज्ञांच्या मते, बायडेन यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. मात्र असं असलं तरीही ट्रम्प यांनी देखील जोरदार टक्कर दिली आहे.  तज्ज्ञांच्या मते, निकालात उत्तर कॅरोलिना, ओहायो आणि पेनसिल्व्हेनियाची भूमिका महत्त्वपूर्ण असू शकते. ट्रम्प यांना तिन्ही राज्यांत विजय मिळवावा लागेल, तर बायडेन यांना यापैकी कोणत्याही राज्यात विजय मिळवून राष्ट्रपती होता येणार आहे. 

ग्लोबल न्युज नेटवर्क: