देशात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासांत 2483 नवे कोरोनाबाधित तर 1399 मृत्यू

वृत्तसंस्था: देशात कोरोनाचा कहर वाढतच आहे. देशात गेल्या २४ तासांत २४८३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. १३९९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी दिवसभरात १९७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ६३५ झाली आहे. तर कोरोनाने चिंता वाढवली ‘आहे.

 आजची ताजी स्थिती

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ६३६ इतकी झाली आहे. सोमवारी दिवसभरामध्ये देशात १९७० रुग्ण कोरोनामुक्त (Corona) झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख २३ हजार ६२२ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ४ कोटी २५ लाख २३ हजार ३११ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत.

याबरोबरच देशात सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर ०.०४ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. देशव्यापी लसीकरणामध्ये आतापर्यंत १८७ कोटीपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. सोमवारी दिवसभरात देशामध्ये २२ लाख ८३ हजार २२४ कोरोना (Corona) लसी देण्यात आल्या आहेत. भारतात आतापर्यंत १८७ कोटी ९५ लाख ७६ हजार ४२३ कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: