2021 च्या मध्यापर्यंत सर्वसामान्य जनतेला कोरोनाची लस दिली जाऊ शकते – डब्ल्यूएचओ

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. रोजच होणारा कोरोना रुग्णांचा विक्रमी रेकॉर्ड यामुळे, देशवासियांच्या चिंतेच आणखीणच भर पडत आहे. देशात कोरोनाचा कहर वाढतच असून कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 40 लाखांच्याही पुढे गेला आहे. तर मृतांचा आकडा सुद्धा कमी नसुन कोरोनामुळे सुमारे 69 हजारांपेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कोरोनाला संजीवनी ठरणारी कोरोना लस कधी येते याकडे भारतासह जगाचे लक्ष लागले आहे.

जगभरात सुमारे 170 पेक्षा अधिक देशात कोरोना लसीचं संशोधन सुरू आहे. त्यामधुन 30 लसीची मानवी चाचणी अंतिम टप्पात आहे. सध्या ब्रिटन, रशिया, अमेरिका, चीनबरोबरच भारतात सुद्धा कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू आहे. कोरोनाच्या लसीची मानवी चाचणी यशस्वी झाली तरी, सर्वसामान्यांना ही लस कधीपर्यंत उपलब्ध होईल. असे असंख्य प्रश्न नागरिकांच्या मनात आहे.

दरम्यान, डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी शुक्रवारी कोरोनाच्या लसीबाबत एक विधान केलं आहे. त्यानी म्हटलं आहे की, 2021 च्या अखरेपर्यंत कोरोनाची लस सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवू शकते. जगभरात कोरोनाच्या लसीची तिसरी चाचणी सुरू असून, या वर्षाच्या शेवटपर्यंत या लसींच्या अंतिम चाचण्या पुर्ण होऊ शकतात.

त्यानंतर जगभरात कोरोना लस पोहोचवण्यासाठी लसीची निर्मिती करावी लागेल. आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात कालावधी लागू शकतो. म्हणूनच 2021 च्या मध्य किंवा अखेरपर्यंत कोरोनाची लस सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे. असल्याचं मत स्वामीनाथन यांनी व्यक्त केलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: