संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजवायला सुरवात केली आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. याच पाश्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच इतर सर्व विध्यार्थी वर्गांचे ऑनलाइन शिक्षण सुरु झालेले आहे. त्यातच अभिनेता आर माधवन यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची लोकांमध्ये खूप चर्चा होताना दिसते आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत त्याची पत्नी सरीता बिरजे गरीब मुलांना शिकवताना दिसते आहे. हा व्हिडीओ खूप वायरल होताना दिसत आहे. तसेच त्यांच्या या कार्याचे कौतुक होताना दिसत आहे.
आर माधवननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आर माधवनची पत्नी सरिता बिरजे गरीब मुलांना ऑनलाइन शिकवताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना आर माधवनने लिहिले, ‘जेव्हा पत्नी तुम्ही खूपच लहान असल्याची जाणीव करून देते.’ या व्हिडिओत आर. माधवन म्हणतोय, ‘जेव्हा तुमची पत्नी देशातील गरीब मुलांना ऑनलाइन शिकवत असते आणि तुम्ही काहीच करत नसता.’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
काही दिसांपूर्वीच , आर. माधवनला २५ मार्चला कोरोनाची लागण झाली होती. त्याने त्यावेळी म्हटले होते की, फरहानच्या रँचोला फॉलो करायचे होते आणि व्हायरस नेहमीच त्यांना फॉलो करत होता. यावेळी त्यांना पकडलेच मात्र ऑल इज वेल आणि कोव्हिड लवकरच विहिरीत पडणार. मी बरा होतोय असं सूचक वक्तव्य केले होते.