नागपूर : राज्यात रुग्णालयाला आग लागण्याचे प्रमाण अधिक वाढले असून काही दिवसांपूर्वी मुंबईतील मॉलमध्ये असलेल्या रुग्णालयाला लागलेल्या आगीत अनेकांना आपले प्राण गमवावेत लागले होते. आता त्या पाठोपाठ नागपुरात सुद्धा अशी घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.त्यामुळे पुन्हा एकदा आघाडीवर टीकास्त्र सोडण्याचा विरोधकांना मुद्दा मिळाला आहे .
मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या वेल-ट्रेड रुग्णालयाला ही भीषण आग लागली आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्ण उपचार घेत होते. आग लागल्यानंतर रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलेले होते. मात्र मागच्या काही दिवसांपूर्ण रुग्णालयांना लागणाऱ्या आगीबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे.
मात्र रुग्णांना इतरत्र हलवताना या घटनेत तीन रुग्णाचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती समोर येत आहे. नागपूरच्या वाडी भागात ही घटना घडलेली आहे.