देशात कोरोनाचा विस्फोट; पावणेचार लाख नवे रुग्ण आणि 3645 मृत्यू

देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला जोर देत बुधवारपासून १८ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी सुरू करण्यात आलीय.  याच दिवशी (बुधवारी, २९ एप्रिल २०२१) रोजी एकूण ३ लाख ७९ हजार २५७ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत ३६४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल २ लाख ६९ हजार ५०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालायकडून देण्यात आलीय.

याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ०४ हजार ८३२ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ५० लाख ८६ हजार ८७८ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत.

देशात सध्या ३० लाख ८४ हजार ८१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २८ कोटी ४४ लाख ७१ हजार ९७९ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १७ लाख ६८ हजार १९० नमुन्यांची करोना चाचणी एकाच दिवशी (बुधवारी) करण्यात आलीय.

एप्रिल महिन्यातील संक्रमित रुग्णांची संख्या
१ एप्रिल : ८१ हजार ३९८
२ एप्रिल : ८९ हजार ०२३
३ एप्रिल : ९२ हजार ९९४
४ एप्रिल : १ लाख ०३ हजार ४९४
५ एप्रिल : ९६ हजार ५६३
६ एप्रिल : १ लाख १५ हजार ३१२
७ एप्रिल : १ लाख २६ हजार ७८९
८ एप्रिल : १ लाख ३१ हजार ८७८
९ एप्रिल : १ लाख ४४ हजार ८२९
१० एप्रिल : १ लाख ५२ हजार ८७९
११ एप्रिल : १ लाख ६८ हजार ९१२
१२ एप्रिल : १ लाख ६१ हजार ७३६
१३ एप्रिल : १ लाख ८४ हजार ३७२
१४ एप्रिल : २ लाख ७३९
१५ एप्रिल : २ लाख १७ हजार ३५३
१६ एप्रिल : २ लाख ३४ हजार ६९२
१७ एप्रिल : २ लाख ६१ हजार ५००
१८ एप्रिल : २ लाख ७३ हजार ८१०
१९ एप्रिल : २ लाख ५९ हजार १७०
२० एप्रिल : २ लाख ९५ हजार ०४१
२१ एप्रिल : ३ लाख १४ हजार ८३५
२२ एप्रिल : ३ लाख ३२ हजार ७३०
२३ एप्रिल : ३ लाख ४६ हजार ७८६
२४ एप्रिल : ३ लाख ४९ हजार ६९१
२५ एप्रिल : ३ लाख ५२ हजार ९९१
२६ एप्रिल : ३ लाख २३ हजार १४४
२७ एप्रिल : ३ लाख ६० हजार ९६०
२८ एप्रिल : ३ लाख ७९ हजार २५७

एप्रिल महिन्यातील मृतांची संख्या

१ एप्रिल : ४६८
२ एप्रिल : ७१३
३ एप्रिल : ५१४
४ एप्रिल : ४७७
५ एप्रिल : ४४६
६ एप्रिल : ६३०
७ एप्रिल : ६८५
८ एप्रिल : ८०२
९ एप्रिल : ७७३
१० एप्रिल : ८३९
११ एप्रिल : ९०४
१२ एप्रिल : ८७९
१३ एप्रिल : १०२७
१४ एप्रिल : १०३८
१५ एप्रिल : ११८५
१६ एप्रिल : १३४१
१७ एप्रिल : १५०१
१८ एप्रिल : १६१९
१९ एप्रिल : १७६१
२० एप्रिल : २०२३
२१ एप्रिल : २१०४
२२ एप्रिल : २२६३
२३ एप्रिल : २६२४
२४ एप्रिल : २७६७
२५ एप्रिल : २८१२
२६ एप्रिल : २७७१
२७ एप्रिल : ३२९२
२८ एप्रिल : ३६४५

ग्लोबल न्युज नेटवर्क: