मुलीवर चांगलेच संस्कार न झाल्यामुळे बलात्कार होतात, भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

मुलीवर चांगलेच संस्कार न झाल्यामुळे बलात्कार होतात, भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

ग्लोबल न्यूज : हाथसार येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकारावरून संपूर्ण देशभरात योगी सरकार आणि भाजपा विरोधात आक्रोश असताना त्यात भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी वादग्रस्त वक्त्यव्य करत देशातील जनतेचा रोष अंगावर ओढावून घेतला आहे.

मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक विधान उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणे हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात, असं सुरेंद्र सिंह म्हणालेत.

या प्रकरणावरून देशभरातील वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. त्यात स्थानिक पोलीस प्रशासनाने रात्रीच्या रात्री पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करून अधिक संशय निर्माण केला आहे. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलेल्या वागणुकीवरून सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: