मुंबई कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून चाकरमान्यांसाठी एक्सप्रेसची व्यवस्था करण्यात आली त्या एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. सोमवारी या मोदी एक्सप्रेसलाकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. मात्र याच मुद्द्यावरून काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय.
सचिन सावंत म्हणाले की, मोदी एक्स्प्रेस? कोकणाशी मोदींचा संबंध काय? चक्रीवादळ आले, पूर आला तरी पहायला देखील आलें नाहीत. गुजरातला तात्काळ जाऊन मदत जाहीर केली. कोकणाबद्दल आस्थाही नाही. उलट कोकणवासीयांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. असे ट्विट करत भाजपवर त्यांनी हल्ला केला आहे.
सावंत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, मोदी एक्स्प्रेस? कोकणाशी मोदींचा संबंध काय? चक्रीवादळ आले, पूर आला तरी पहायला देखील आलें नाहीत. गुजरातला तात्काळ जाऊन मदत जाहीर केली. कोकणाबद्दल आस्थाही नाही. उलट कोकणवासीयांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. नाव द्यायचंच होतं तर बॅ.नाथ पै किंवा मधु दंडवतेंचे दिले असते” असे त्यांनी ट्विटध्ये म्हटले आहे.
मोदी एक्स्प्रेस? कोकणाशी मोदींचा संबंध काय? चक्रीवादळ आले, पूर आला तरी पहायला देखील आलें नाहीत. गुजरातला तात्काळ जाऊन मदत जाहीर केली. कोकणाबद्दल आस्थाही नाही. उलट कोकणवासीयांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे.
नाव द्यायचंच होतं तर बॅ.नाथ पै किंवा मधु दंडवतेंचे दिले असते— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 8, 2021