मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीए यांच्या नावाने आपल्याला धमकीचा फोन आल्याचा आरोप शिवसेनेचे सह संपर्क प्रमुखांनी केला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जळगावच्या सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप गुलाबराव वाघ यांनी केला आहे.
मात्र अशा धमक्यांना आपण भिक घालणार नाही अस गुलाबराव वाघ यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहायकाने जळगावचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत स्वतःसह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी आरोप केला आहे
जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या विरोधात जळगावात काल शिवसेनेच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आक्रोश मोर्चा मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चात सहभागी होत असताना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना मोबाईलवर फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने मी एकनाथ शिंदेंचा पीए बोलत असून तुम्ही आमदारांचा विरोध का करत आहात? विरोध करायचा नाही नाहीतर तुम्हाला जीवे ठार मारू, अशी धमकी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने गुलाबराव वाघ यांना दिली.
या धमकीनंतर गुलाबराव वाघ यांनी प्रत्युत्तर दिले, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्हाला जे करायचे असेल ते करा. बंडखोरांचा यापुढे विरोध करूच. असे प्रत्युत्तर गुलाबराव वाघ यांनी दिले. मोर्चाच्या समारोप झाल्यानंतर गुलाबराव वाघ यांनी भाषण करताना एकनाथ शिंदे यांच्या पीएचां धमकीचा फोन आल्याचे जाहीर भाषणात सांगितले.