Tuesday, May 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी १ वाजता पत्रकार परिषद

by Team Global News Marathi
March 12, 2022
in मनोरंजन
0
भाजपा नेते घेणार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची करणार मागणी ?

 

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या सागर या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होणार आहे.यामध्ये देवेंद्र फडणवीस हे परमवीर सिंग, अनिल देशमुख, रश्मी शुक्ला फोन टॅप प्रकरण तसेच नवाब मलिक यांच्याविषयी भाष्य करण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात या मुद्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

दरम्यान, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालच देवेंद्र फडणीस यांनी आशिष शेलार यांच्यासोबत राजभवन इथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच आज देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत असल्याने सगळ्यांच्या नजरा आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लागल्या आहेत.मागच्या चार दिवसापूर्वी सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते.

राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

विशेष सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. त्यामध्ये गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करताना कशा प्रकारचं कट कारस्थानं सरकारचं रचतंय याचा खुलासा करणारे अनेक व्हिडीओ असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. सव्वाशे तासांचे हे व्हिडीओ सभागृहात दाखवले तर सभागृहाची इभ्रत जाईल असंही ते म्हणाले. या व्हिडीओच्या २० ते २५ वेब सीरीज होतील असाही टोलाही त्यांनी सभागृहात लगावला होता. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले होते.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
एसटी संपकऱ्यांच्या विरोधात आता नागरिकांचे आंदोलन !

एसटी महामंडळाच्या संपाबाबत मोठी बातमी;मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले महत्वपूर्ण आदेश...!

Recent Posts

  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group