शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज: शरद पवार

शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज: शरद पवार

ग्लोबल न्यूज; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या भेटीला त्यांच्या घरी पोहचले आहेत. त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे सुद्धा सोबत आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्यावर लीलावती रुगालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती या संदर्भात त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार आज संजय राऊत यांच्या घरी पोहचले आहे.

या भेटींदरम्यान शरद पवार आणि साजणी राऊत यांनी शेतकरी कृषी कायद्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाबाबत सुद्धा सविस्तर चर्चा केली. या संदर्भातील वृत्त टीव्ही ९ या वृत्तवाहिनीने दाखविले आहे. या चर्चे दरम्यान सदाभाऊ खोत सुद्धा आझाद मैदान येथे कृषी कायद्या विरोधात आंदोलनाला बसणार आहे असे अजित पवार यांनी बोलून दाखविले.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर या भेटीत चर्चा करण्यात आली. शरद पवार यांनी पंजाब आणि हरियाणा आणि इतर राज्य गहू मोठय प्रमाणात उत्पादित करत असल्याचे सांगितले. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी गहू उत्पादित केल्याचा फायदा इतर ठिकाणी होतो, असंही शरद पवार म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: