बुलढण्याचा ठाकटर आणि शिंदे गटात तुफान राडा, पोलिसांना करावी लागली मध्यस्थीराज्यात शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यापासून दोन्ही गटात वाद होत असल्याचे चित्र दिसून येत असून आता बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेच्याकार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान गोंधळ घातला. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा येथे सत्कार समारंभ सुरू होता. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र आणि कार्यकर्ते इथं आल्यानं कार्यकर्तेही एकमेकांना भिडले. कार्यकर्ते पोलिसांसमोरच भिडल्याने काही काळ तणावाचे वातापरण निर्माण झाले होते.
बुलढाणा कुषी उत्पन बाजार समिती येथे शिवसेनेच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, या कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांचा पुत्र आणि कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम सुरू असताना अचानक आमदार गायकवाड यांचे कार्यकर्ते तेथे आल्याने दोन्ही गट आमोरासमोर भिडले.
शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा इथे सत्कार समारंभ सुरू होता. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र आणि कार्यकर्ते इथं आले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते अचानक पुढे आल्यानं कार्यकर्तेही एकमेकांना भिडले. त्यानंतर परिस्थिती निवळण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या वातावर शांत आहे.