ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक, जंतर-मंतरवर पुकारले आंदोलन

 

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटूंनी दंड थोपटले आहे. देशातील नामांकित कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर कालपासून (23 एप्रिल) पुन्हा आंदोलन सुरु केलं आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु केलं आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी या आंदोलकांनी केली असून तो पर्यंत मागे हटणार नाही अशी हाक आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या अडीच महिन्यांपूर्वी देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर या मागणीवरुन ब्रिजभूषण शरण सिंह आणि ऑलिम्पियन कुस्तीपटू यांच्यातील वाद पुन्हा तापताना दिसत आहे. काल कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा ब्रिजभूषण शरण सिंह आरोपांचा पुनरुच्चार केला. त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. यासंदर्भात कुस्तीपटूंनी पत्रकार परिषदही घेतली आहे. जोपर्यंत पैलवानांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत जंतरमंतर इथं आंदोलन करणार असल्याचा पवित्रा कुस्तीपटूंनी घेतला आहे

सात कुस्तीपटूंनी मुलींनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. परंतू, त्यांच्या तक्रारी देऊनही एफआयआर नोंदवला जात नसल्याचे कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्याने अद्याप तक्रार दाखल केली नसून, याबाबत जाणून-बुजून विलंब केला जात असल्याचे मलिक म्हणाल्या. समितीच्या चौकशीत काय निष्पन्न झालं, याबाबत कोणतेही तथ्य मांडण्यात आलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचे म्हणणे ऐकावं, अशी आमची इच्छा असल्याचं साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी सांगितलं. आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आहे. कुस्तीचे भवितव्य सुरक्षित हातात असावे हीच आमची इच्छा असल्याचे ते म्हणावे.

Team Global News Marathi: