18 फेऱ्या पूर्ण- पंढरपूर तालुक्याची मतमोजणी संपली, पहा पंढरपूर तालुक्यातुन कुणी किती मतांची घेतली आघाडी ? आता मंगळवेढा सुरू..
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुक निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सकाळपासून मतमोजणी च्या 18 फेऱ्या पूर्ण झाल्या असून काटे की टक्कर सुरू आहे. अवताडे-भालकेत या दोघात भाजपचे अवताडे अवघ्या 4100 मतांनी आघाडीवर आहेत.
यात पंढरपूर क्षेत्रातील एकूण 18 फेर्या होणार आहेत. तर मंगळवेढा क्षेत्रातील 20 फेर्या होणार आहेत .
18 व्या फेरी अखेर – 4100 मतांनी भाजपचे समाधान अवताडे आघाडीवर आहेत.
अठरावी फेरी
समाधान अवताडे ४१०० मतांनी आघाडीवर
पंढरपूर तालुका मतमोजणी संपली.
19 ते 38 या फेऱ्या मंगळवेढा तालुक्यातील असणार आहेत.