वाढदिवस विशेष: सर्वसामान्यांना प्रेम देणारे व गुन्हेगारांची धडकी भरवणारे आय.पी.एस पी आर पाटील
सरूड (ता. शाहूवाडी ) येथील पी. आर. पाटील यांची भारतीय पोलिस सेवेत पोलिस अधीक्षक पदी दोन वर्षांपूर्वी (आय.पी.एस) निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीने सरुड गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा गेला खोवला आहे. पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असताना पाटील हे सर्वसामान्य नागरिकांना प्रेम तर तर गुन्हेगारांच्या गोटात धडकी भरवण्यात यशस्वी झाले आहेत.
प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणी चिकाटीच्या जोरावर विक्रीकर निरीक्षक, तहसिलदार, पोलिस उपअधिक्षक, पोलिस उपायुक्त ते पोलिस अधिक्षक (आय.पी.एस) पदापर्यंतचा त्यांचा २५ वर्षाचा प्रवास हा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे . पी. आर. पाटील हे सध्या नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
सरुड येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या पी. आर. पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सरुड येथे तर महाविधालयीन शिक्षण मलकापूर येथे झाले. विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर १९९५ मध्ये त्यांनी स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाला सुरवात केली. दोनच वर्षामध्येच त्यांनी विक्रीकर निरीक्षक परिक्षेत यश सपांदन केले. त्यांनतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेतुन १९९८ मध्ये त्यांची तहसिलदारपदी निवड झाली. पंरतू एवढयावर समाधान न मानता मुंबई उपायुक्त विश्वास नांगरे – पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन १९९९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतुनच त्यांनी पोलिस उपअधिक्षकपदाला गवसणी घातली.
प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधिक्षक म्हणून प्रथम त्यांची जळगाव येथे नेमणूक झाली. प्रशिक्षणाचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर अचलपूर (जि. अमरावती ) येथे त्यांची नेमणूक करण्यात आली. अचलपूर बरोबरच त्यांनी पंढरपूर,पुणे ग्रामीण ( राजगुरुनगर) येथेही पोलिस उपअधिक्षक म्हणून उत्तम सेवा बजावली. त्यांनतर पुणे गुन्हे अन्वेषण शाखेत उपायुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणत मोठमोठ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.त्यानी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय येथे ही एसीपी म्हणून उत्कृष्ट काम केले.
पुण्याहुन त्याची नागपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे पोलिस अधिक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली. त्यांनतर त्यांची कोल्हापूर नागरी संरक्षण हक्क विभागाचे पोलिस अधिक्षक म्हणून बदली झाली. दिड वर्ष ते या पदावर कोल्हापूर येथे कार्यरत होते. येथे सेवा बजावत असतानाच पाटील यांची भारतीय पोलिस सेवेमध्ये पोलिस अधिक्षकपदी (आय.पी.एस) म्हणून निवड झाली आहे.
मागील एक वर्षांपासून ते आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या काळात त्यानी
. सर्वसामान्यांना पोलिस गुन्हेगारांना पकडतो एवढेच माहिती असते. शहर पोलिस, तालुका पोलिस व जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय एवढेच जुजबी ज्ञान सर्वसामान्यांना असते. परंतू नंदुरबार पोलिस अधीक्षक पी आर पाटील त्यांच्या एक वर्षाच्या काळात धडाकेबाज कामगिरी केली आहे.
पोलिस अधिक्षक पी आर पाटील जेवढे प्रेमळ स्वभावाचे आहेत तेवढेच गुन्हेगारी क्षेत्रातील गुंडाना व आरोपोंसाठी कर्दनकाळ ठरले आहेत. त्यांच्या भोळ्या आणि निष्पाप चेहऱ्या आड दडलेला गुन्हे प्रवृत्तीचा बिमोड करण्याचा निर्धार नंदुरबारकरांना चांगलाच भावला प्रशासन सेवेतील खाकीतील दानशुर कर्ण वर्दीच्या पलिकडे माणूस म्हणून जगणारा अधिकारी पी आर पाटील यांचे नंदुरबार जिल्ह्यात कौतुक होतं
ही आहेत त्यांची ठळक कामे
नंदुरबार येथे गावठी पिस्तूल व काडतूस जप्त गुन्हेगार वस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर छापे
स्थानिक गुन्हे शाखेने घाड घालून एका १७ वर्षाच्या आरोपीकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी केली लॅपटॉप चोरी पानवारा आश्रमशाळेतील चोरीचा गुन्हा उघडकीस
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत ७ लाख ८६ हजार रुपये किमतीचा ११२ किलो गांजा जप्त
सीसीटीएनएस प्रणालीत जिल्हा राज्यात तिसरा नंदुरबार पोलीस दलाची कामगिरी
नंदुरबार पोलिसांच्या मदतीला धावून आला पुष्पा’; चोरीच्या आरोपातील दोघे ‘गजाआड
घर सोडून गेले निघून; पोलिसांनी आणले शोधून ! जिल्ह्यातील ६६ जणांचा शोध जिल्हा पोलीस दलाची कामगिरी
दुर्गम भागातील काल्लेखेतपाडा : नदीतील पाण्यामुळे विद्यार्थी होते शिक्षणापासून वंचित, पोलीस अधीक्षकांचे दातृत्व सोय! पोलिसांनी उभारला दुर्गम भागात पूल
नंदुरबार जिल्हयात पोलीसांकडून ३० ठिकाणी पाणपोईंची
… आणि पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्यामुळे कोरोना शहीद पोलीसांच्या घरी साजरी झाली दिवाळी
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांविषयीच्या कामकाजाबद्दल माहिती घेवुन नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या कामगिरीचे कौतुक केले.
आजपर्यंतच्या त्यांच्या या वाटचालीमध्ये त्यांना मुंबईचे उपायुक्त विश्वास नांगरे – पाटील, पोलिस अधिक्षक संदिप दिवाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
एक प्रेमळ माणूस, खमक्या अधिकारी आणि उत्कृष्ट कलाकार असलेले पी आर हे चांगले चित्रकार ही आहेत. पेन्सिल स्केच काढण्यात त्यांचा हातखंडा आहे.
सरूड- पोलिस अधिकाऱ्यांच्या गावातील पी.आर.
पाटील सरूड गाव हे पोलिस अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. पी.आर. पाटील यांच्या स्पर्धा परिक्षेतील यशानंतरच गावात किंबहुना शाहूवाडी तालुक्यात खऱ्या अर्थाने स्पर्धा परिक्षेचे वारे वाहु लागले. पी. आर. पाटील यांचा आदर्श घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तसेच परिसरातील अनेक युवकांनी स्पर्धा परिक्षेत यश संपादन केले आहे.
आज खाकी वर्दीकडे पाहिलं तर अनेकांना तिरस्कार निर्माण होतो होय अगदी मलाही कारण, खूप जुनी म्हण आहे. खाकीसे ना दोस्ती अच्छी ना दुष्मणी. या वाक्याला मी अजिबात छेद देणार नाही. कारण, यात तिळमात्र चूक नाही. हे आजवर अनुभवले नाही अशी अगदी बोटावर मोजता येतील इतकीच माणसं पहायला मिळतील पोलिसांना तोंडावर गोड बोलतीलही, पण मागेपुढे बाप रे कानाला सहन होणार नाही असले शब्दप्रयोग असतात पण असो. लोकं देवाची गाऱ्हाणी करतात, ही तर माणस आहेत. शिव्या शाप देवाला चुकले नाही, तेथे यांची काय मिजास.
काही असो पण एक सांगू अगदी मानातून, कोणी कितीही मोठ्या पदावर जावो, कितीही माज करो पण त्याने माणूसकी सोडायला नको हवंतर जशास तसे वागा पण मनमानी राजवाट नको जेव्हा आकाशाला गवसणी घालुनही तुमचे पाय जमिनीवर असतील ना, तेव्हा समजून घ्या आपल्यातला माणूस जिवंत आहे. समजायचं तरी कशाला लोक आपोआप अशा व्यक्तीला डोक्यावर घेतात. नकळत आणि अनपेक्षीत त्याचा उदो-उदो होत असतो. तेव्हा तो खाकीच्या पलिकडील लोकमान्य अधिकारी ठरत असतो. आता तुम्हाला इतके प्रमाण का द्यावे लागले असतील कारण पोलीसाला कोण चांगलं म्हणतय का पण, त्यांच्यातही एक माणूस असतो. हे विसरून कसे चालेल. हे मी एकटा नव्हे नंदुरबार जिल्ह्यातील लाखो लोकांनी लोकमान्य केलेले पोलीस अधिक्षक पी आर पाटील यांचा जनता लोकमान्य म्हणून शब्दोशब्दी गौरव करते तेव्हा त्यांच्यासोबत पोलीस दलाचा सन्मान वाढतो.
खाकीत माणूस आहे. हे जर कोणाला खरं वाटलं असेल तर पाटील सरांकडे पाहुन वाटते. आज त्यांच्या वाढदिवसानिमीत्त हे प्रकर्षाने वास्तव लिहावे वाटते पोलिस अधिक्षक पी आर पाटील जेवढे प्रेमळ स्वभावाचे आहेत तेवढेच गुन्हेगारी क्षेत्रातील गुंडाना व आरोपोंसाठी कर्दनकाळ ठरले आहेत. त्यांच्या भोळ्या आणि निष्पाप चेहऱ्या आड दडलेला गुन्हे प्रवृत्तीचा बिमोड करण्याचा निर्धार नंदुरबारकरांना चांगलाच भावला प्रशासन सेवेतील खाकीतील दानशुर कर्ण वर्दीच्या पलिकडे माणूस म्हणून जगणारा अधिकारी पी आर पाटील यांचे नंदुरबार जिल्ह्यात कौतुक होतं..
म्हणून ते कर्म पेरत गेले आणि आज आमच्यासारखे त्याची मशागत करत आहेत. उगविण्यासाठी कारण चांगलं पेरुनही उगवलं नाही तर लोकं पेरायचं सोडून देतील आणि विघातक समाज निर्माण होईल. म्हणून चांगल्या बियांची जोपासना आम्ही लिखानातून करतोय. त्यातलं हे एक अनमोल बी म्हणजे साहेब.. ज्या झाडाला समाजकल्याण नावाची पालवी आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत सहकार्य नावाचे फळ आहे. अशा औदुंबरास उदंड आयुष्य लाभो आई हीच आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना.
प्रशांत हिरे-सुरगाणा