सोन्याच्या दरात 24 तासात मोठी वाढ: दर पोहचले एवढ्या हजारांवर

भारतात गुंतवणुकीसाठी सोने (Gold Price Today) हा योग्य पर्याय समजला जातो. सर्वसामान्यांपासून तर अनेक जण सोन्यात गुंतवणूक अधिक प्रमाणात करताना दिसतात. अनेक दिवसांपासून या सोन्याच्या दरात (Gold Price Today) कधी वाढ तर कधी कमी नोंद होताना दिसत आहे. अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण देखील झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे आढळून आले. तर मागील 24 तासात सोन्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोन्याचे दर 59 हजार 300 रुपयांवर पोहोचले आहेत.

सोन्याचा दर कालपर्यंत जळगाव मध्ये जीएसटीशिवाय 58 हजार 300 रुपये इतका होता. हाच दर आज 59 हजार 300 रुपये आणि जीएसटीसह हा दर 61 हजार 080 रुपये वर जाऊन पोहोचला आहे. आजचा सोन्याचा दर (Gold Price Today) विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचल्याने सर्वसामान्यांनी सोन्याच्या खरेदीकडे पाठ वळवली आहे. सोन्याच्या इतिहासातील हा सर्वाधिक दर असल्याचे जळगावचे सोने व्यापारी सांगत आहेत.

अमेरिकेतील मोठ्या बँका बुडाल्यामुळेच सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. मोठमोठे नामांकित बँक बुडाल्यामुळे जागतिक पातळीवर बँकेवर आता कोणाचा जास्त विश्वास बसत नाही त्यामुळेच गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून आता सोन्याची निवड केली आहे. त्यामुळे आता सोन्याच्या मागणीत वाढ होऊन दर 61 हजार रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. मात्र सर्वसामान्यांना हे दर न परवडणारे असल्याचे जनसामान्यात बोलले जात आहे. आज सोन्याचे दर 61 हजार झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाका बाहेर सोन्याचे दर गेले आहेत. त्यामुळे आता सोन्याची हौस पूर्ण करायची असेल तर नकली दागिने घालून फिरावे लागेल अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक देताना दिसत आहेत.

देशात बनावट दागिन्यांचे विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे या फसवणुकीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता फक्त सहा अंकी हॉलमार्क वैध ठरणार आहे, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
यावेळी त्यांनी चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्क गोंधळाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
सहा अंकी हॉलमार्क शिवाय सराफांना सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत.
तसेच आता चार अंकी हॉलमार्क पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत.

बनावट सोन्याची विक्री रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे आता या नव्या नियमांमुळे ज्वेलर्स आणि ग्राहकांवर मोठा परिणाम होणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: