कर्नाटक | कर्नाटक राज्यात लवकरच राजकीय उलथापालट होण्याची सहायता वर्तवली जात असून मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजपच्या पक्षनेतृत्वाने त्यांचं वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांचा राजीनामा मागितला आहे.
सध्या या वृत्ताबाबत मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी इन्कार केला आहे. येडियुरप्पा यांनी आपल्या राजीनाम्याची अफवा असल्याचं म्हणत हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. सध्या येडियुरप्पा यांचं वाढतं वय आणि प्रकृतीच्या तक्रारींमुळं येडियुरप्पा यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्याचं म्हटलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज येडियुरप्पा यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेतली. या भेटीतही येडियुरप्पांनी राजीनाम्याचा मुद्दा काढला. त्यानंतर भाजप हायकमांडनं त्यांना आश्वस्त केलं आहे की, लवकरच कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतला जाईल. लवकरच विधिमंडळ गटनेत्यांची बैठक होईल तोवर येडियुरप्पा मुख्यमंत्री असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.