मोठी बातमी – 2 हजाराच्या नोटेसंदर्भात केंद्राचा लोकसभेत महत्त्वाचा खुलासा –

मोठी बातमी – 2 हजाराच्या नोटेसंदर्भात केंद्राचा लोकसभेत महत्त्वाचा खुलासा –

नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता आणि एका रात्रीत 500 च्या जून्या आणि 1000 च्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी 500 च्या नव्या नोटांसोबतच 2000 ची नवी नोट बाजारात आणण्यात आली. 2000 ची नोट आल्यादिवसापासूनच विविध कारणांनी चर्चेत राहिली आहे.

2000 च्या नोटाही लवकरच बंद होणार अशा अफवा देखील नोटा बाजारात उपलब्ध झालेल्या दिवसांपासून फिरू लागल्या होत्या. मात्र 2000 च्या नोटांसदर्भातील या अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं. तसेच यामध्ये एक विशिष्ट चीप असल्याच्याही अफवा उठल्या होत्या. मात्र तिही अफवाच होती.

मात्र आता जे वृत्त आलं आहे ते लोकसभेत केंद्राकडून अधिकृतरित्या देण्यात आलेलं उत्तर आहे. लोकसभेत 2000 च्या नोटेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना केंद्रानं स्पष्ट केलं आहे की, गेल्या दोन वर्षात 2000 ची एकही नोट छापण्यात आलेली नाही. यामुळे आता पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आलं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं लोकसभेत केंद्राकडून देण्यात आलेलं उत्तर ट्विट केलं आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: