मोठी बातमी! ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजींचा राजीनामा

मोठी बातमी! ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजींचा  राजीनामा

सोलापूर : जागतिक पातळीवरील वर्ष 2020 चा ‘ग्लोबल टिचर अॅवॉर्ड’ पटकाविलेले सोलापुरचे ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले गुरुजींनी राजीनामा दिला आहे. डिसले गुरुजींबाबत असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एख समीती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच डिसले गुरुजींनी राजीनामा दिला आहे.

ग्रामीण शालेय विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत क्यूआर कोड शिक्षण प्रणाली विकसित करून जागतिक पातळीवर पोहोचलेले आणि डिसेंबर २०२० मध्ये युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशनचा सात कोटी रूपयांचा जागतिक शिक्षक पुरस्कार मिळविलेले सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले हे प्रकाशझोतात आले होते. नंतर अमेरिकेतील फुलब्राईट अभ्यासवृत्ती डिसले यांना जाहीर झाल्याचे सांगण्यात आले होते.

त्यानुसार अमेरिकेत जाण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ अध्ययन रजा मागितली होती. परंतु जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्याबाबतची रीतसर कागदपत्रे डिसले यांनी मागणी करूनही शेवटपर्यंत कोणतीही कागदपत्रे सादर केली नव्हती. उलट, शिक्षण विभागात शैक्षणिक संशोधनासाठी अमेरिकेत जाण्याकरिता रजा मंजुरीसाठी लाच मागितली, अधिकारी आपला मानसिक छळ करतात, असा गंभीर आरोप डिसले यांनी केला होता.

अभिमानास्पद ! अमेरिकेकडून ग्लोबल टीचररणजितसिंह डिसले गुरुजींना मिळणार फुलब्राईट’ शिष्यवृत्ती

तेव्हा तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्तक्षेपानंतर डिसले यांना तब्बल १५३ दिवसांची प्रदीर्घ अध्ययन रजा मंजूर झाली होती. तथापि, त्यांनी केलेल्या आरोपाची चौकशी सुरू असता डिसले यांनी आपण केलेले आरोप खरे नसून भावनेच्या भरात केलो होतो, असा पवित्रा घेतला होता.

दरम्यान, जागतिक शिक्षक पुरस्कार मिवण्यापूर्वी डिसले यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागातून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत तीन वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. मात्र ते जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत रुजू झाल्याची नोंद कोठेही आढळून आली नाही. त्या दरम्यान, त्यांना नियमित पगारही अदा झाला होता. या प्रकरणाचीही चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले असता शिक्षण विभागाच्या पाच अधिकाऱ्यांच्या समितीने डिसले यांची चौकशी केली होती

. यात ते मोठ्या प्रमाणात दोषी असल्याचा अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांच्याकडे सादर झाला होता. या चौकशीची फेरपडताळणी होऊन शेवटी डिसले यांच्या विरोधात कारवाईबाबतचा अहवाल जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सादर झाला होता. त्यावर अद्यापि कोणतीही कारवाई झाली नाही.

ते कार्यमुक्त होतील

रणजीतसिंह डिसले यांनी आठ जुलै रोजी राजीनामा दिला आहे. माझ्यासमोर मंगळवार 12 जुलै रोजी राजीनाम्याचे पत्र आले. त्यांना एक महिन्याचा सूचना कालावधी  देण्यात आला आहे. आठ ऑगस्टनंतर ते कार्यमुक्त होतील.
– किरण लोहार, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जिल्हा परिषद

ग्लोबल न्युज नेटवर्क: