बिग ब्रेकिंग ! आयपीएल रद्द, अनेक खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने घेतला निर्णय

बिग ब्रेकिंग ! आयपीएल रद्द, अनेक खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने घेतला निर्णय

ग्लोबल न्यूज – 2021 ची आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. अनेक खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. अनेक टिम मधील खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने उर्वरित स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

 

दरम्यान, सोमवारी होणारा बंगळुरू आणि कोलकाता या संघातील सामना पुढे ढकलण्यात आला होता. भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असताना देशात सुरू असलेल्या आयपीएल बाबत अनेकांनी टीका केली होती. तसेच, स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: