बिग ब्रेकिंग ! देवेंद्र फणडवीस राज्यपालांच्या भेटीला; बहुमत चाचणीची केली मागणी
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर हे राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय भाजपकडून आता सत्तास्थापने बाबतच्या हालचालींना वेग आल्याच दिसतं आहे.
आज दिवसभर देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये होते. ते दुपारी मुंबईत आले आणि आता थेट राजभवनावर गेल्यामुळे भाजप आता सत्तासंघर्षामध्ये उघडपणे सामिल झाल्याचं बोललं जात आहे. शिवाय भाजपकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणी बद्दलचे पत्र दिलं असून यासाठीच हे शिष्टमंडळ राजभवनात पोहचले असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
We've given a letter to Mahrashtra Gov & told him that the 39 Shiv Sena MLAs are saying that they don't want to be with NCP,Cong govt; it shows MVA govt has lost the majority. We've requested Gov to direct CM to immediately prove his majority through Floor test: Devendra Fadnavis pic.twitter.com/AfeRr9HjVI
— ANI (@ANI) June 28, 2022