Big Breaking : कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ; काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात

 

Big Breaking : कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ; काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात

चंदिगड : पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. 40 आमदारांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविरोधात आघाडी उघडल्यानंतर पक्षाने शनिवारी विधिमंडळ गटाची बैठक बोलावली आहे. ही बैठक संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. त्याचबरोबर कॅप्टन अमरिंदर सिंग आपल्या कॅम्पच्या आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या समर्थक आमदारांसमवेत सध्या बैठकीत आहेत. यादरम्यान, विविध माध्यमांनी वृत्त दिले आहे की, कॅ. अमरिंदर सिंग हे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात. यासोबतच ते काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना संवाद साधला आणि त्यांना विश्वासात न घेता कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावल्याबद्दल एआयसीसीवर आक्षेप नोंदवला. त्यांच्या मते, जर ते अशाच प्रकारे पक्षात साइडलाइन राहिले तर मुख्यमंत्री म्हणून कायम राहण्यास असमर्थ आहेत.

दुसरीकडे, सिद्धू गटातून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची चर्चा आहे. सूत्रांनुसार, नाराज आमदार विधिमंडळ गटाचे नेते म्हणून नवज्योतसिंग सिद्धू किंवा सुनील जाखड यांचे नाव पुढे करू शकतात.

विधिमंडळ गटाच्या बैठकीत कोण-कोण येणार?

पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहतील. यात दोन केंद्रीय निरीक्षक अजय माकन आणि हरीश चौधरीदेखील उपस्थित राहतील. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनीही ट्विट करून म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या सूचनेनुसार विधिमंडळ पक्षाची बैठक 18 सप्टेंबरला बोलावण्यात आली आहे.

दुसरीकडे, पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीआधी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग त्यांच्या निष्ठावंत पक्षाच्या आमदारांसोबत बैठकीसाठी चंदीगड येथील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचले.

मुख्यमंत्र्यांच्या प्रेस सेक्रेटरीचे सूचक ट्विट

कॅप्टन अमरिंदर सिंग हे मुख्यमंत्रिपदाचा आणि काँग्रेसचा राजीनामा देणार असल्याच्या बातम्यांच्या दरम्यान त्यांचे प्रेस सचिव विमल सुंबाली यांनी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, “जर कोणी तुम्हाला फसवून तुम्हाला चकित करत असेल, तर तुम्हाला योग्य उत्तर देऊन त्यांना धक्का देण्याचा अधिकार आहे.”

अमरिंदर मुख्यमंत्री पदासह काँग्रेसचा राजीनामा देऊ शकतात

ही या घडीची सर्वात मोठी बातमी असू शकते. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासह काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देऊ शकतात. सध्या अमरिंदर सिंग आपल्या कुटुंबासोबत आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या चंदीगड येथील अधिकृत निवासस्थानी आहेत. दरम्यान, कॅप्टनच्या निवासस्थानी कॅबिनेट मंत्री ब्रह्ममोहिंद्र त्यांना भेटायला आले आहेत.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना काँग्रेस हायकमांडचा इशारा

सूत्रांनुसार, बैठकीपूर्वीची मोठी घडामोड म्हणजे काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास सांगितले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांच्यासह हायकमांडने नियुक्त केलेले दोन निरीक्षकही आजच्या बैठकीला उपस्थित राहतील.

अमरिंदर यांना बाजूला सारल्याने अँटी इन्कम्बन्सी संपेल?

अनेक आमदारांना वाटते की, कॅप्टन सरकार 2017 मध्ये जनतेला दिलेली शेकडो आश्वासने पूर्ण करू शकली नाही, त्यामुळे लोक संतापले आहेत आणि काँग्रेसची स्थिती हलाखीची आहे. पण प्रश्न असा आहे की, निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला लावून अँटी इन्कम्बन्सी संपेल का?

अमरिंदर यांचे नेतृत्व बहुतेकांना अमान्य

गेल्या आठवड्यात मंत्र्यांशी सल्लामसलत केल्यानंतर अनेक आमदारांनी हायकमांडला विधिमंडळ गटाची बैठक बोलावण्यासाठी पत्र लिहिण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. आमदार सुरजीत धिमन यांनी तर असे म्हटले की, जर काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर यांच्या नेतृत्वाखाली 2022 ची निवडणूक लढवली, तर ते निवडणूक लढणार नाहीत.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: