ग्लोबल न्यूज – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. सचिनने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. आपल्याला सध्या सौम्य लक्षणे असून, होम क्वारंटाईन असल्याचे सचिनने म्हंटले आहे.
सचिनने आपल्या ट्वीटवर अकाऊंटवरून आपली कोरोना चाचणी सकारात्मक आल्याचं सांगितलं आहे. सचिन आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेतली तरी आज माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. घरातील इतर सर्वांची चाचणी नकारात्मक आली आहे.’
‘मी सध्या होम क्वारंटाईन असून डॉक्टरांनी दिलेल्या सुचनांचे पालन करत आहे. मला सपोर्ट करत आहेत त्या सर्व डॉक्टर आणि आरोग्य सेवकांचे आभार मानतो.’ असे सचिनने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
दरम्यान, नुकत्याच झालेल्या रोड सेफ्टी क्रिकेट सिरिज मध्ये भारताने विजय मिळवला. सचिनने इंडिया लिजन्डस या टिमचे नेतृत्व केले होते.