भगवंत मान आज घेणार पंजाबच्या मुख्यंमत्री पदाची शपथ, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राहणार उपस्थित

पंजाब | आम आदमी पार्टीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून आज भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा हा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव खटकर कलान येथे होणार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी पंजाबमधून तीन लाख लोक येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे ४० एकर जागेवर मोठा मंडप टाकण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भगतसिंग स्मारकासमोर तीन मोठे स्टेज बांधण्यात आले आहेत. मुख्य मंचावर शपथ ग्रहण सोदळा संपन्न होणार आहे. तर दुसऱ्या मंचावर नवनिर्वाचित आमदार आणि तिसऱ्या मंचावर अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाचे इतर बडे नेते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षांच्या एकाही नेत्याला निमंत्रित करण्यात आलेले नाही.

भगवंत मान यांच्या शपथविधी कार्यक्रमात हेलिपॅड आणि २५ हजार वाहनांच्या पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमात कोणताही गडबड होऊ नये, यासाठी प्रत्येक टप्प्यावर दहा हजार पंजाब पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी या शपत ग्रहण कार्यक्रमावर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, या शपथ ग्रहण सोहळ्यावरुन दिल्लीतील भाजपचे आमदार परवेश वर्मा यांनी आम आदमी पार्टीवर टीका केली आहे. पर्यायी राजकारणाच्या नावाखाली आपचे जाहिरातींचे राजकारण वाढत आहे. 57 लाखांच्या रोड शोनंतर, आप ने शपथविधी सोहळ्यासाठी सरकारी तिजोरीतून 2 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचे वर्मा म्हणालेत. या शपथविधी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भगवंत मान यांनी केले आहे.

Team Global News Marathi: