पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यांवर काल प्रचारफेरी दरम्यान चार अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. या धक्काबुक्कीत त्यांच्या पायाला जबर मार लागला होता अशी माहिती त्यांनी स्वतः दिली होती. तसेच या झालेल्या हल्यावरून पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
या झालेल्या हल्यावर आता शिवसेना महिला नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट केले आहे. तंदुरुस्त होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरा असा सल्ला दिला आहे. तसेच या झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला आहे.
त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘जी गोष्ट तुम्हाला तोडू शकत नाही ती तुम्हाला आणखी मजबूत करते. अशी ताकत आम्ही यापूर्वी पाहिलेली नाही. बंगालची वाघिण लवकरात लवकर तंदुरुस्त होईल. ममतादीदी तुम्ही पुन्हा मैदानात कधी उतराल याची आम्ही वाट पाहात आहोत. असे ट्विट त्यांनी केले आहे.
https://twitter.com/UrmilaMatondkar/status/1369874113402007557