मुंबई | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. यानंतर गुरुवारी नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिकांना ईडीने समन्स पाठवल्याचे समोर आले आहे. पण कप्तान मलिक यांनी समन्स बजावल्याचे फेटाळले आहे. कप्तान मलिक हे सुद्धा कुर्ला प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडणून आले आहेत.
कप्तान मलिक म्हणाले, एक युटर्न लॉ आहे. तुम्ही कोणाला कितीही दाबा, पण तो दुप्पट वेगाने वरती येतो. तसेच मलिक कुटुंबियांना कितीही दाबले तरी थांबणार नाही. आम्हाला नवाब मलिक वडिलांप्रमाणे आहेत. त्यामुळे ते जे काही आम्हाला आदेश देतील, त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. तसेच मला ईडीने कुठलीही नोटीस बजावली नाही.
नवाब मलिकांवर माझा पूर्णपेण् विश्वास आहे. त्यांनी आयुष्यात कधी काहीही चुकीचे केलेले नाही आणि करणारही नाहीत. जर मलिकांवरील आरोप सिद्ध झाल्यास या गांधीच्या पुतळ्याच्या समोर उभे राहू आणि लोकांनी आम्हाला गोळी मारावी. आमचा अंडरवर्ल्डबरोबर कोणताही संबंध नाही, असा खुलासा त्यांनी केला.