उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. नाणार आणि बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरून त्यांनी हल्लाबोल केला आहे. 12 जानेवारी 2022 ला बारसु मध्ये रीफायनरी व्हावी, जगातील हा मोठा प्रकल्प झाल्यास जीडीपी 1.5 ने वाढणार आहे. असं पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दिलं होतं. मात्र आता रीफायनरी होतेय तर त्याला विरोध करायचा ही दुटप्पी भूमिका असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
आता उद्धव ठाकरे उदय सामंत यांच्या आरोपांना उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.जरी मी पत्र दिलं होतं, पण मी अडिच वर्षात पोलीस बळाचा वापर करून तिथे गेलो नाही. राज्याच्या मुळावर येणारे विषय मी थांबवून ठेवले होते. नाणार, बारसूची भूमिका माझी नाही, तर तिथल्या लोकांची भूमिका होती. मुख्यमंत्री झाल्यावर प्राथमिक अहवाल घेतला. बारसूची जागा मोकळी आहे म्हणून सांगितल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ग्रीन रिफायनरी म्हणताय मग जोरजबरदस्ती कशाला करता? मोदीजी म्हटले होते मोठा प्रकल्प देऊ हाच का मग मोठा विनाशकारी प्रकल्प असा सवाल करतानाच हिंमत असेल तर जनतेत जा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.