केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. हा दौरा आणि या दौऱ्यात त्यांनी केलेलं भाषण शिवसेनेला चांगलेच झोंबले असून सातत्याने शाह यांच्यावर टीका केली जात आहे.आता अमित शाह यांच्यावर शिवसेनेनं केलेल्या टीकेला आता भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.
सत्ता गमावल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. बापाच्या जीवावर जगणाऱ्यांनी स्वयंभू नेते असलेल्या भारताच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याच्या आधी आपली लायकी तपासावी. बापाचे नाव नसते तर आपल्याला एखाद्या फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढत बसावे लागले असते,’ अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यावेळी पुन्हा एकदा शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून टीका करत सेनेची सत्ता असलेल्या मुंबई मानपावर भाजपचा नगरसेवक बसवण्याचा निर्धार केला होता यावरून सेनेच्या नेत्यांनी थेट भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला होता यावरून या दोन्ही पक्षात शाब्दिक चकमक सुरू झाली होती.