तृणमूलसाठी प्रचार करणे टाळा, काँग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी लिहिले शरद पवारांना पत्र
सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. त्यात तृणमूल, काँग्रेस आणि भाजपा या तीन पक्षात मुख्य लढत होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव हे तृणमूलच्या स्टार प्रचारकांच्या यादीत सामिल करण्यात आले आहे. यावर आता काँग्रेसने नाराजी दर्शवली आहे.
पश्चिम बंगालसारख्या राज्यात केंद्रीय नेतृत्त्वाकडून सुरू असलेले हल्ले पाहता लोकशाहीचा आदर करणाऱ्या कोणत्याही पक्षानं ममता बॅनर्जींना पाठिंबा द्यायला हवा, असे विधान शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
आता त्यानंतर काँग्रेसचे नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवारांना एक पत्र लिहिले आहे. पश्चिम बंगालमध्ये येऊन ममता दीदी यांच्या तृणमूलचा प्रचार करू नका, असे आवाहन त्यांनी केलं आहे. तुम्ही स्टार प्रचारक म्हणून बंगालमध्ये आल्यास मतदारांचा गोंधळ होईल. त्यामुळे तृणमूलसाठी प्रचार करणे टाळा असे त्यांनी आपल्या पात्रात म्हटले आहे. सध्या देहसातील अनेक राज्यात राष्ट्रवादी- काँग्रेस युती आहे मात्र या प्रचार फेरीमुळे अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल.