Friday, February 3, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

औरंगाबादमध्ये, युवा सेना आक्रमक; कर्नाटकच्या बसला काळं फासले

by Team Global News Marathi
December 7, 2022
in महाराष्ट्र
0
औरंगाबादमध्ये, युवा सेना आक्रमक; कर्नाटकच्या बसला काळं फासले

 

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादाचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायाला मिळत आहे. दरम्यान याच मुद्यावरून औरंगाबादमध्ये युवा सेना आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. आज सकाळी (बुधवार) शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात कर्नाटकमध्ये जाणाऱ्या गाड्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. सोबतच भगव्या रंगाने बसवर जय महाराष्ट्र सुद्धा लिहिले. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादावरून तणावाचे वातावरण आहे.

दरम्यान काल बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे याचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहे. औरंगाबादमध्ये देखील आज कर्नाटक बसला काळं फासण्यात आले आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे. तर काळे फासण्यात आलेल्या बस सुरक्षित ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. तर घटनास्थळी पोलीस देखील पोहचले असल्याचे बोलले जात आहे.

औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकात सकाळी साडेपाच वाजता युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे आंदोलन सुरु केले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार, महराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
शिवसेना संपवायची वेळ आली याचं मुख्य कारण हे संजय राऊत आहेत

कर्नाटकातील हल्ल्यानंतर संजय राऊतांचं दिल्लीकडे बोट

Recent Posts

  • मालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण
  • ईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
  • शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
  • व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा
  • कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group