राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सत्ता महाविकास आघाडीवर विविध मुद्दयावरून निशाणा साधताना दिसून येत आहे अशातच आता परभणी येथे काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कुख्यात मटका किंग आबेद कासम पठाण याला पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.
या पक्षप्रवेशात महत्वाचा मुद्धा म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. या संदर्भात ट्विट करून थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’बेवडा कम्पनीचे भले केल्यानंतर आता मटकावाल्यांचे कोटकल्याण. नाना पटोलेंच्या उपस्थितीत औरंगाबादच्या मटका किंगचा काँग्रेसमध्ये प्रवेश’, असे भातखळकर म्हणाले आहेत. सध्या या पक्ष प्रवेशाचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून भाजपला गुंडाचा पक्ष म्हणून टीका करणाऱ्या काँग्रेसकडून मटका किंगला पक्षात प्रवेश देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.