राम मंदिर जमीन घोटाळ्याचे प्रकरण जगासमोर आणणाऱ्या खासदार संजय सिंग यांच्या घरावर हल्ला !

अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा जमीन घोटाळ्यामुळे चर्चेत आला असून यावरून काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उडवली आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने जमीन खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि सपा नेते पवन पांडे यांनी केला होता. या आरोपांमुळेच एकच खळबळ उडाली होती तसेच या मुद्द्याला धरून विरोधकांनी सुद्धा भाजपा आणि RSS वर जोरदार टीका केली होती.

मात्र हा घोटाळा उघडीस आणणारे तसेच खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करणारे आम आदमी पक्षाचे खासदार संजयसिंह यांच्या घरावर हल्ला झाला आहे. हा हल्ला भाजपने केला आहे. भाजपने कितीही गुंडगिरी केली तरी राममंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही. त्यासाठी माझी हत्या झाली तरी बेहत्तर, असे संजय सिंह यांनी भारतीय जनता पावसाला ठणकावून सांगितले आहे. या आरोपामुळे भाजपने जोरदार निशाणा साधत सिंह यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.

आप’चे खासदार संजयसिंह आणि सपा नेते पवन पांडे यांनी दोन दिवसांपूर्वी लखनौत पत्रकार परिषद घेऊन श्रीरामजन्मभूमी मंदिर ट्रस्टवर जमीन खरेदी घोटाळयाचा आरोप केल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. संजयसिंह यांनी या संपूर्ण जमीन खरेदी व्यवहाराची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने आरोप फेटाळले आहेत.

खासदार संजयसिंह यांच्या नवी दिल्लीतील घरावर हल्ला झाला. काळी शाई फेकण्यात आली. संजयसिंह यांनी दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार देऊन व्हिडीओ मेसेज केला आहे. ”आपले निवासस्थन राष्ट्रपती भवनापासून 100 मीटरवर आहे. संजयसिंह को गोली मारो, अशा घोषणा देत माझ्या घरावर हल्ला केला. नेमप्लेटवर काळी शाई फेकली. असे संजयसिंह यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: