तर मला केवळ अमेरिका दिसते- जो बायडेन; विजयानंतर अमेरिकन जनतेला केले संबोधित

न्यूयॉर्क: तब्बल तीन दिवस सुरु असलेल्या मतमोजणीनंतर अध्यक्षीय निवडणुकीत बाजी मारणाऱ्या जो बायडन यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी सकाळी अमेरिकन जनतेला पहिल्यांदाच संबोधित केले. आपल्या पहिल्याच भाषणात बायडन यांनी ट्रम्प समर्थकांना भावनिक साद घातली.

या निवडणुकीत ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान केले होते, त्यांची निराशा मी समजू शकतो. आता आपण एकमेकांना नवी संधी देऊयात. आता एकमेकांविषयी आरोप-प्रत्यारोप करण्याचे थांबवायला पाहिजे, वातावरणातील तणाव कमी झाला पाहिजे आणि आपण एकमेकांना नव्या नजरेतून बघायला हवे, असे आवाहन जो बायडन यांनी केले.

अमेरिकेच्या जनतेने मला विजयी केले आहे. अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षपदासाठी इतके (74 कोटी) मतदान झाले. त्यामुळे आपला विजय हा निर्भेळ आहे. मी अमेरिकेचा अध्यक्ष या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो की, मी विभाजनाचे राजकारण करणार नाही, एकात्मतेसाठी प्रयत्न करेन. मला रेड (रिपब्लिकन) किंवा ब्ल्यू (डेमोक्रॅटस) अशी वेगवेगळी राज्य दिसत नाहीत तर मला केवळ अमेरिका दिसते, असे बायडन यांनी सांगितले.

जो बायडन या निवडणुकीत 279 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर ट्रम्प यांना अवघे 214 मते मिळाली आहेत. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: