राज्यात देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरवात झाली असून या निवडणुकीच्या प्रचाराला शिवसेना. राष्ट्रवादी आणि काँग्रेस तसेच भारतीय जनता पक्ष सुद्धा मैदानात उतरला आहे तर दुसरीकडे व्हँचित बहुजन आघाडीचा उमेदवार सुद्धा या दोन्ही मतबल पक्षाच्या उमेदवाराला टक्कर देताना दिसून येत आहे अशातच पोटनिवडणुकीनिमित्त वंचित आघाडीच्या वतीने प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या टिकेवरून जोरदार निशाणा साधला होता. ‘अशोकराव बोलले वंचितच्या गाडीत पेट्रोल भाजप भरते. अशोकराव, ही चूक आयुष्यात पुन्हा कधी करू नका. निवडणूक होऊ द्या, आमच्या गाडीमध्ये कुणी-कुणी पेट्रोल भरलं हे राहु द्या, आम्ही हायकोर्टात विचारतो आदर्श प्रकरणात कुणाकुणाचा फ्लॅट आहे.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अशोक चव्हाण आपणाला बायको आणि सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा? असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी अशोक चव्हाण यांना इशारा दिला. तसंच, एक मोर्चा हायकोर्टावर गेला की, तुम्ही दडवलेली फाईल पुन्हा बाहेर येईल आणि सुशीलकुमार शिंदे यांनाही जेलमध्ये घेऊन जाईल, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.