Saturday, September 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Apple कंपनी भारतात करणार मोठी नोकरभरती; या पदांसाठी लगेच करा अर्ज

by Team Global News Marathi
January 11, 2023
in नवी दिल्ली
0
Apple कंपनी भारतात करणार मोठी नोकरभरती; या पदांसाठी लगेच करा अर्ज

 

काही दिवसांपासून अनेक IT कंपन्या नोकर कपात करत आहेत. आयटी इंडस्ट्रीमध्ये असं नोकरकपातीचं वातावरण असताना अ‍ॅपलने मात्र मोठ्या प्रमाणावर नोकरभरती घोषित केलीय. त्यांच्या भारताच्या वेबसाइटवर पदभरतीच्या अनेक संधींबाबतची अधिसूचना कंपनीने जाहीर केली आहे. त्यात बहुतांश पदं बिग डेटा सॉफ्टवेअर इंजिनीअर्स आणि DevOps इंजिनीअर्सची आहेत. ‘कंटेंट डॉट टेकगिग डॉट कॉम’ने त्याबाबत वृत्त दिलं आहे. अ‍ॅपल कंपनी भारतात त्यांची फ्लॅगशिप स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे.

2015 पासून त्यांचं त्याबाबत काम सुरू आहे. कंपनीच्या सध्याच्या मोठ्या नोकरभरतीवरून लवकरच अ‍ॅपल ही दुकानं सुरू करणार असल्याचं दिसतं आहे. बिग डेटा सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची पदभरती कंपनीच्या बेंगळुरू इथल्या ऑफिसमध्ये होणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे विविध जबाबदाऱ्या हुशारीने सांभाळण्याची हातोटी हवी. तसं नियोजित वेळेत सोल्युशन्स देता यायला हवीत.

उमेदवाराला 12X7 ऑन कॉल रोटेशनमध्ये सहभागी व्हावं लागेल. प्रॉडक्शन संदर्भातल्या समस्यांचं त्वरित निराकरण करण्याची जबाबदारी उमेदवारावर असेल. एकापेक्षा जास्त टीम्ससोबत काम करण्याची सवय उमेदवाराला हवी. पात्र उमेदवाराला Kubernetes किंवा container orchestration frameworks चा अनुभव घेता येईल.100 टेराबाइट्स डेटासह मोठ्या Hadoop/S3 क्लस्टरमधला अनुभवही मिळेल.

पात्रता – जावा आणि / पायथॉनमधलं ज्ञान – आकिर्टेक्ट, बिल्डिंग, एंड टू एंड काफ्का बेस्ड डेटा पाइपलाइन्समध्ये काम केल्याचा अनुभव हवा. तसंच स्पार्क जॉब्स, एअरफ्लो DAGs, ज्युपिटर नोटबुक्समध्ये अनुभव हवा.
– डिस्ट्रिब्युटेड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीमध्ये विशेष प्रावीण्य हवं. – परफॉर्मन्स ट्युनिंग अ‍ॅप्लिकेशन्सची उच्च जाण असावी. DevOps इंजिनीअर्सची पदभरती हैदराबाद ऑफिसला सुरू आहे. त्या पदासाठी इच्छुक उमेदवारानं प्रॉडक्शनमधल्या तांत्रिक समस्यांवर त्वरित सोल्युशन देणं अपेक्षित आहे.

कॉन्फिगरेशनबाबत नोंदी करणं, कठीण विषयांबाबत युझर्सना प्रशिक्षण देणं, स्टेटस रिपोर्ट लिहिणं, अ‍ॅपलचे इतर कर्मचारी व व्यवस्थापनासोबत संवाद ठेवणं या जबाबदाऱ्या उमेदवारावर असतील. सिस्टिमची स्टॅबिलिटी, सुरक्षा, उत्पादनक्षमता, स्केलेबिलिटी वाढवण्यासाठी मार्गदर्शन करणं. भविष्यातल्या क्षमतांबाबतच्या गरजा निश्चित करणं, नवीन उत्पादनांविषयी तपासणी करणं हे काम उमेदवाराला करावं लागेल. बॅकअप सिस्टीमची योग्य अंमलबजावणी करणं हेही एक काम असेल.

 

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
मोठी बातमी | शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने बजावली नोटीस

संजय राऊत जगातील सर्वात विद्वान व्यक्ती, त्यांनी 'या' गोष्टी कराव्यात

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group