सुरत येथील कस्टम सिंथेसीस आणि विशेष रसायनांच्या निर्मितीत कार्यरत असलेली अनुपम रसायन इंडिया लिमिटेड (“कंपनी” किंवा “अनुपम रसायन”), चा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाची बोली (“इश्यू” / “बोली”) शुक्रवार, १२ मार्च २०२१ रोजी खुला होणार असून मंगळवार, १६ ,मार्च २०२१ रोजी बंद होणार आहे. या प्रस्तावाचा किंमत पट्टा प्रती शेअर रु. ५५३.०० – रु. ५५५.०० दरम्यान निश्चित करण्यात आला. ही कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम”) च्या सल्ल्यानुसार, पायाभूत गुंतवणूकदार (अँकर इन्व्हेस्टर्स) चा सहभाग बोली खुली होण्याच्या एक कार्यालयीन दिवसाअगोदर बुधवार, 10 मार्च, 2021 लक्षात घेणार आहे.
या व्यवहारात रु. ७,६०० दशलक्ष इक्विटी शेअरचा पूर्ण ताजा इश्यू समाविष्ट असून तो बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”)वर सूचीबद्ध होईल. या व्यवहारातून जमा होणारी रक्कम कंपनी काही कर्जांचा परतावा/ मुदतपूर्व परतावा करण्यासाठी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणास्तव वापरणार आहे.
अनुपम रसायन ही एक अग्रगण्य कंपनी असून ती भारतात कस्टम सिंथेसीस आणि विशेष रसायनांच्या निर्मितीत कार्यरत आहे. (स्त्रोत: “इंडीपेन्डेट मार्केट रिपोर्ट ऑन क्रॉप प्रोटेक्शन, फार्मास्युटिकल्स अँड कस्टम सिंथेसीस” दिनांक १४ डिसेंबर २०२०) (“एफ अँड एस रिपोर्ट”) फ्रॉस्ट अँड सुल्लीवन निर्मित आणि प्रकाशित, कंपनीने इश्यूच्या संदर्भात कमिशन व भरणा केला. ही कंपनी दोन प्रकारच्या कार्य परिघात काम करते. त्यापैकी एक लाईफ सायन्सेस असून यामध्ये विशेष रसायनांचा समावेश असलेली उत्पादने तयार करण्यात येतात. ज्यामध्ये अॅग्रोकेमिकल्स, पर्सनल केअर आणि फार्मास्युटिकल; तसेच अन्य विशेष रसायने, विशेष पिगमेंट आणि डाय, पॉलिमर अॅक्टीव्हीटीचा समावेश आहे. अनुपम रसायनने विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांसह बळकट आणि दीर्घकालीन नाते विकसीत केले आहे. ज्यामध्ये सिजेंटा एशिया पॅसिफिक पीटीई लिमिटेड, सुमीटोमो केमिकल कंपनी लिमिटेड आणि युपीएल लिमिटेडचा समावेश आहे. यामुळे कंपनीची उत्पादन श्रेणी वाढली व ती युरोप, जपान, अमेरिका आणि भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत कंपनीचे कामकाज भारतातील गुजरातमधील सहा बहुउद्देशीय निर्मिती सुविधाकेंद्रांतून चालते. चार सुविधाकेंद्रे सचिन, सुरत, गुजरात येथे तर दोन झगाडीया, भरूच, गुजरात येथे आहे.
आर्थिक वर्ष १८ ते आर्थिक वर्ष २० दरम्यान कंपनीच्या एकूण महसुलात २४.२९ % सीएजीआरने वाढ झाली कंपनीच्या सुविधाकेंद्रात सुरू झालेल्या कामकाजातून आर्थिक वर्ष २० करिता ईबीआयटीडीए ₹ १,३४८.९६ दशलक्ष एवढा राहिला. कामाच्या पद्धतीत झालेला बदल तसेच मर्यादित कर्मचारी बळ या स्थितीचा परिणाम महसुलावर दिसून आला. कोविड-१९ महासाथीचा प्रभाव असूनही कंपनीच्या कामकाजातून जमा झालेल्या महसुलात ४५.०३% ची महत्त्वपूर्ण वाढ झाल्याचे आढळले. ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपलेल्या नऊमाहीत ती रकम ₹ ३,७१८.०७ दशलक्ष दरम्यान राहिली तर ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या नऊमाहीपर्यंत महसुलाची रक्कम ₹ ५,३९२.२० दशलक्ष याप्रमाणे होती.
एक्सिस कॅपिटल लिमिटेड, अॅम्बिट प्रायव्हेट लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे या प्रस्तावाचे बुक रनिंग मॅनेजर (“बीआरएलएम”) आहेत.
या इश्यू बुक बिल्डींग प्राईजच्या माध्यमातून सेबी आयसीडीआर नियमन ६ (१) अनुसार खुला करण्यात आला असून कंपनीला मिळालेल्या बीआरएलएमच्या सल्ल्यानुसार पायाभूत संस्थात्मक खरेदीदार (“क्यूआयबी”) (“क्युआयबी” भाग) ना गुणोत्तर आधारे वाटपासाठी उपलब्ध राहील. अर्थात कंपनी आणि विक्री समभागधारकांनी बीआरएलएमचा सल्ला मानून क्यूआयबीचा ६०% भाग पायाभूत गुंतवणूकदार (अँकर इन्व्हेस्टर) किमतीवर, पायाभूत गुंतवणूकदारांकरिता स्वैच्छिक तत्वावर राखून ठेवावा. ज्यापैकी एक तृतियांश भाग स्वदेशी म्युच्यूअल फंडांसाठी राखीव असून तो स्वदेशी म्युच्यूअल फंडांकडून येणा-या वैध बोलीच्या किंवा पायाभूत गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवलेल्या किमतीपेक्षा जास्त असलेल्या बोलीच्या अधीन आहे. त्याशिवाय क्यूआयबी वर्गाच्या ५% भाग केवळ म्युच्यूअल फंडांसाठी गुणोत्तर तत्वावर उपलब्ध करुन दिला जाईल. निव्वळ क्यूआयबी भाग उर्वरित, क्यूआयबी (पायाभूत गुंतवणूकदार वगळता), म्युच्युअल फंडासह, प्रमाणबध्द आधारावर वाटप करण्यासाठी उपलब्ध असेल, त्यांच्याकडून मिळणाऱ्या वैध बोलीवर किंवा बोली रक्कमेहून अधिक किमतीच्या अधीन राहील. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी गुणोत्तर आधारित उपलब्ध नेट इश्यू ५०% हून अधिकचा नसेल.