नवी दिल्ली | क्रिकेटपटू रिषभ पंत याचा काल भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये त्यांना मोठी दुखापत झाली होती. सध्या त्याच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्वच प्रार्थना करत आहेत. दरम्यान अभिनेते अनिल कपूर आणि अभिनेते अनुपम खेर यांनी नुकतीच रुग्णालयात जाऊन रिषभची आणि त्याच्या परिवाराची भेट घेतली. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन बॉर्डरनजीक त्याच्या कारला अपघात झाला.
रिषभ पंत सध्या डेहरादून च्या मॅक्स रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचे शरीर भाजले असून नुकतीच त्याच्यावर सर्जरी पार पडली आहे. रिषभची विचारपूस केल्यानंतर अभिनेते अनिल कपूर आणि अभिनेते अनुपम खेर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘सर्वांनी रिषभसाठी प्रार्थना करावी’, असे ते यावेळी म्हणाले. तसेच क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी रिषभ पंत याच्यासाठी प्रार्थना केली होत.
यानंतर रिषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. रिषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली. माहिती मिळताच देहरादून पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचल्या. सध्या रिषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. त्याला रुरकीहून डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याची माहिती सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी दिली.