नववधू आलिया भट्ट सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे खूप चर्चेत आहे. पण आता ही अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे आणि ‘कॉफी विथ करण’मध्ये दिसल्याने प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. खरंतर, अलीकडेच चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो ‘कॉफी विथ करण’ शोच्या प्रोमोचा आहे. या एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग दिसणार आहेत.
या लेटेस्ट प्रोमोमध्ये करण जोहर दोघांसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये करण जोहर आलियाला विचारतोय की लग्नानंतर कोणता भ्रम तुटला? यावर आलिया म्हणते, हनिमून असं काही नसतं. तुम्ही त्यावेळी इतके थकलेले असता की. यावर करण जोहर जोरजोरात हसायला लागतो.
यानंतर करण जोहरने रणवीर सिंगला विचारलं की त्याच्याकडे सेक्स प्ले लिस्ट आहे का? यावर रणवीर उत्तर देतो की माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्स प्ले लिस्ट आहेत, तो हे बोलताच त्याच्या तोंडातून तो आवाज काढू लागतो आणि आलिया त्याला साथ देऊ लागते.