चक्रीवादळ निवारमुळे प्रशासनाकडून अलर्ट जारी, हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई: चक्रीवादळ निवार मंगळवार ते बुधवारदरम्यान आंध्र प्रदेश  तामिळनाडू आणि पाँडिचेरीच्या  किनाऱ्यावर आदळू शकते. असंही सांगितलं जातय की हे वादळ २५ नोव्हेंबरला तामिळनाडू आणि पाँडिचेरीला पार करेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या दरम्यान हवेचा वेग १०० ते १२० किमी प्रति तास असू शकतो. यातच तामिळनाडू आणि पाँडिचेरीमधील काही भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आली आहे. तसेच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

चक्रीवादळ निवारमुळे प्रशासनाकडून अलर्ट जारी

मंत्रिमंडळाचे सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली एनसीएमसीने संबंधित कामांशी जोडलेल्या लोकांना आदेश देण्यात आले आहेत की वादळामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये तसेच प्रभावित क्षेत्रांमध्ये स्थिती लवकरात लवकर सामान्य व्हावी. दरम्यान, वादळासाठी करण्यात येणाऱ्या तयारीची समीक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली. यात आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पाँडिचेरीच्या सचिवांचा समावेश आहे.

मुख्य सचिवांनी एनएमसीला आपली तयारी करण्यास सांगितसे तसेच आव्हानाशी लढण्यासाठी एनडीआरफ टीम आणि इतर एजन्सीना समन्वय साधण्याबाबत एनसीएमसी माहिती दिली. भारतीय हवामान विभागाचे महासंचालकांनी सध्याच्या स्थितीबाबत माहिती दिली असून संबंधित राज्यांना याबाबतची माहिती दिली जात आहे.

किनाऱ्या लगतच्या शहरांमध्ये पुराची शक्यता

तामिळनाडूच्या किनाऱ्या लगतच्या शहरांमध्ये पंबनपासून ते चेन्नईदरम्यान २४ आणि २५ नोव्हेंबरला मुसळधार पाऊस तसेच वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. या दरम्यान किनाऱ्यालगतच्या शहरांमध्ये अनेक जागांवर पुराची शक्यता आहे. तसेच मुसळधार पावसासह वेगवान वारेही वाहण्याची शक्यता आहे. २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पाँडिचेरीच्या किनारी भागातील ठिकाणे प्रभावित होण्याची शक्यता आहे.

बैठकीत सांगण्यात आले की कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना तेथील परिस्थितीनुसार आदेश देण्यात आले आहेत. घर, वीज, दूरसंचार, नागरी उड्डाण आणि आरोग्य मंत्रालयाचे सचिव तसेच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, राष्ट्रीय आपत्ती बल व्यवस्थापनाचे सदस्य सचिव, एनडीआरएफचे महासंचालक आणि संरक्षण मंत्रालयाचे एक प्रतिनिधी यांच्याकडून संबंधित राज्यांना मदतीबाबत तसेच केलेल्या तयारीबाबत एमसीएमसीशी समन्वय साधला जाणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: