Saturday, May 28, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किमया शेअर बाजाराची: 10 पैशाचा शेअर पोहचला तब्बल 571 रुपयांवर ,10 हजाराचे झाले पावणेसहा कोटी रुपये

by ग्लोबल न्युज नेटवर्क
March 27, 2022
in देश विदेश
0
किमया शेअर बाजाराची: 10 पैशाचा शेअर पोहचला तब्बल 571 रुपयांवर ,10 हजाराचे झाले पावणेसहा कोटी रुपये
ADVERTISEMENT

किमया शेअर बाजाराची: 10 पैशाचा शेअर पोहचला तब्बल 571 रुपयांवर ,10 हजाराचे झाले पावणेसहा कोटी रुपये

ग्लोबल न्यूज नेटवर्क: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेकांना झटपट चांगले रिटर्न्स मिळण्याची इच्छा असते. परंतु, शेअर मार्केटमध्ये संयम महत्त्वाचा असतो, असा सल्ला दिला जातो. आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होताना पाहायला मिळत आहेत.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

आठवडाभरात कमी झालेले खनिज तेलाचे दर, परकीय वित्तसंस्थांकडून झालेली खरेदी यामुळे शेअर बाजारामध्ये चांगली वाढ झालेली दिसून आली. शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्याने गुंतवणूकदारांची श्रीमंती वाढली आहे.

 

ADVERTISEMENT

शेअर बाजाराचे भांडवलमूल्य ७१,९२९.२४ कोटी रुपयांनी वाढून २,६०,३७,७३०.७८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या उत्साहाला उधाण येऊ लागणार आहे. यातच काही कंपन्या दमदार कामगिरी करत असल्याचे दिसून येत आहे. गुंतवणूकदारांच्या वाढत्या विश्वासामुळे काही वर्षांत चांगले रिटर्न्स देत आहेत.

 

GRM Overseas ही कंपनी शेअर बाजारात कमाल कामगिरी करत आहे. १ एप्रिल २००४ रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत केवळ १० पैसे होती. मात्र, १७ मार्च २०२२ रोजी याच कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल ५७१ रुपयांवर गेली आहे.

 

याचाच अर्थ GRM Overseas कंपनीने सुमारे १८ वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना तब्बल ५.७१ लाख टक्क्यांचे बंपर रिटर्न दिल्याचे सांगितले जात आहे. या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्डही चांगला असल्याचे म्हटले जात आहे. २३ मार्च २०१२ रोजी या कंपनीचा शेअर १.८५ रुपयांवर होता.

 

आता १० वर्षानंतर GRM Overseas च्या शेअरची किंमत ५७१.९५ झाली आहे. गेल्या १० वर्षांत कंपनीने गुंतवणूकदारांना ३० हजार ८१६ टक्के परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. गेल्या ५ वर्षांचा विचार करता, जीआरएम ओव्हरसिज कंपनीने गुंतवणूकदारांना ९ हजार ५४५ टक्क्यांचा परतावा दिला आहे.

 

GRM Overseas च्या गुंतणूकदारांची छप्परफाड कमाई झाली आहे. एखाद्या व्यक्तीने कंपनीच्या शेअरची किंमत १० पैसे असताना १० हजार रुपयांची गुंतवणूक केली असती, तर १८ वर्षांच्या कालावधीनंतर या गुंतवणूकदाराला तब्बल ५ कोटी ७२ लाख रुपये मिळाले असते, असे सांगितले जात आहे.

 

इतकेच नव्हे, तर एखाद्या व्यक्तींने १० पैशांच्या शेअरवर एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता १८ वर्षांनी या व्यक्तीला ५७ कोटी रुपयांचा परतावा मिळाला असता, असे सांगितले जात आहे. याच क्रमात एखाद्या व्यक्तीने एक हजाराची गुंतवणूक केली असती, तर त्याला ५७ लाख रुपये मिळाले असते.

 

GRM कंपनीची स्थापना १९७४ मध्ये झाली होती. जगभरातील देशांमध्ये तांदूळ निर्यातीचे काम ही कंपनी करते. कंपनीचा आतापर्यंतचा प्रवास खूप मोठा आणि प्रगतीकारक राहिला असल्याचे सांगितले जात आहे.

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: छप्परफड रिटर्नतेजीशेअर बाजार
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

गोवंश हत्या बंदी कायदा केला आहे, काही दिवसांनी श्वास घेण्यावर बंदी घालतील

Next Post

यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिले ५० लाखांचे घड्याळ, २ कोटीच्या भेटवस्तू?

Next Post
यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिले ५० लाखांचे घड्याळ, २ कोटीच्या भेटवस्तू?

यशवंत जाधवांनी 'मातोश्री'ला दिले ५० लाखांचे घड्याळ, २ कोटीच्या भेटवस्तू?

Recent Posts

  • केंद्र सरकारची मोठी घोषणा!! शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख !
  • ईडीने भाजपचा झेंडा घेऊन धाडी टाकाव्यात ; बच्चू कडूंची थेट केंद्र सरकारवर टीका
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची शिवसैनिकांकडून जोरदार तयारी सुरु
  • ‘शिवछत्रपती’ हे कुणा एकट्याच्या मालकीचे नाहीत, आम्हांला तोंड उघडायला लावू नका
  • शरद पवारांचं बाहेरुनच गणपती दर्शन, मनसेने जुना संदर्भ देत लागवला टोला

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group