राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी चहरचा राजकीय वर्तुळात होताना दिसून येत असून यावरून जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात होत आहे अशातच आता यावर शिवसेना गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिंदे गटाच्या आमदारांना टोला लगावला आहे.
अंधारे म्हणाल्या की, ज्या पद्धतीने सध्या राजकारण केलं जातंय ते जाणीवपूर्वक भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकण्याच काम सुरू आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या.यासोबतच सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या हिंदुत्वावरही टीका केली. शिंदे गटाचं बेगडी हिंदुत्व उघडं पडत असल्याचं त्या म्हणाल्या. शिंदे गटाचे बेगडी हिंदुत्व उघडे पडत आहे. राष्ट्रवादीसोबतची अनैसर्गिक युती आता नैसर्गिक कशी झाली?असा प्रश्न उपस्थित करत शिंदे गटातील आमदार आणि नेत्यांचे अब तेरा क्या होगा कालिया असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
अजित पवार भाजपसोबत जाणार या चर्चेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. बीड जिल्हा दौऱ्यात त्या माध्यमांशी संवाद साधला. सुषमा अंधारे म्हणाल्या की, वज्रमूठ सभा तसेच इतर सभा पाहता मुद्दामहून खोड करण्याची कार्यपद्धती भाजपची सुरू आहे. मात्र आता सुरू असलेल्या राजकारणावरून शिंदे गटाच्या आमदारांची काळजी वाटत आहे. परंतु इतर काही असो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने ठामपणे ठरवले आहे. आम्हाला भाजपच्या मुजोरीविरोधात लढणे क्रमप्राप्त आहे.