मी आणि माझ्या सहकाऱ्यांबाबत विनाकारण काहीही बातम्या पसरवल्या जात आहेत. राज्यातील महत्त्वाच्या विषयाचे प्रश्न दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं अजित पवार नॉट रिचेबल, अजित पवार भाजपच्या संपर्कात अशा बातम्यांमुळे रंगलेल्या चर्चेला आता पूर्णविराम द्या, हा विषय थांबवा असं आवाहनही त्यांनी यावेळी केली.
राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र आणि आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानं वेगळी चर्चा राज्यात सुरुय. त्यावर अजित पवार म्हणाले की, मी विधान परिषदेत बसत असतो. आज सगळे आमदार मला भेटायला आले आहे. यात वेगळा अर्थ काढू नका. आमदार त्यांच्या मतदारसंघातील काम घेऊन आले आहे. त्याच्यामुळे आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. तो सुद्धा संभ्रम अवस्थेत गेला आहे.
काहीही काळजी करू नका, शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पक्ष स्थापन झाला आहे. ज्या बातम्या पसरवल्या जात आहे, त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहे. राज्यातील महत्त्वांच्या विषयाचे प्रश्न दुसरीकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच अजित पवार यांनी नाव न घेता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना फटकारलं आहे.
संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या भूमिकेबाबत केलेल्या वक्तव्याचा पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले की, तुमच्या पक्षाचं काय बोलायचं आहे ते बोलाना, तुम्ही ज्या पक्षाचे मुखपत्र आहे, त्याबद्दल बोला. तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं, तसं झालं, आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी ठाम आहोत. आमचं वकिलपत्र घेण्याचं कुणी कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका त्यांनी मांडावी, आमची भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आमच्याकडे माणसं आहे.
उद्धव ठाकरे सुद्धा उत्तर देतात, मी एकटा नडेन. मी त्यांना सुद्धा एकत्र विमान प्रवासात सांगितलं होतं. शिंदे गटाचे नेते तर आम्ही त्यांना घेणार असंही बोलत आहे, पण कोण जाणार आहे. आता हे पूर्ण थांबवा, याचा पूर्णपणे तुकडा पाडा, यामध्ये कारण नसताना, 40, 50 आमदारांच्या सह्या झाल्या नाही. ज्या चर्चा आहेत यात कोणतंही तथ्य नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं