मुंबई | शिवसेनेचे नेते संजय राऊत हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले होते. राऊत हे पवारांना कोणत्या विषया संदर्भात भेटायला आले आहेत, याचं कारण समोर आले नव्हते. मात्र, राऊत अचानक पवारांच्या भेटील आल्याने तर्क वितर्कांना उधाण आलं होता. आता या भेटीचा तपशील खुद्द संजय राऊत यांनी माध्यमांना दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, आज महाराष्ट्रातील विविध विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्राच्या प्रश्नांसंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्यासंदर्भात चर्चा झाली. शरद पवारांसोबत राज्यातील गंभीर विषयांवरच चर्चा झाली. परमबीर सिंग यांचा विषय शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली जाईल इतका मोठा विषय नाही. शरद पवारांनी सकारात्मक सूचना दिल्या एसटीचा विषय गंभीर आहे. लवकरचं तो विषय सुटेल.
एसटी संपाबाबत शरद पवार आणि परिवहन मंत्री यांच्यात चर्चा झाली आहे. लवकरच यातून तोडगा निघेल. आजच्या पवार यांच्या बैठकीतुन असं मला समजलं को त्यांनी सकारात्मक सूचना दिल्या आहेत. वातावरण कोण भडकवत आहे हे सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवत आहे आणि का करत आहे हे सर्वांना माहिती आहे.
एसटीच्या संपात कोण तेल ओतत आहे हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न अमरावती पासून एसटी संपापर्यत होत आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सर्वाना सहानुभूती आहे. परमबीर सिंग समोर येऊन बोलत असतील तर ते ऐकून घेण्यात येईल. ते आता आरोपी आहेत. आणि ज्याच्यावर आरोप आहेत तो असं बोलत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.