एअरटेलनंतर जिओचा ग्राहकांना झटका, अनेक लोकप्रिय प्रिपेड प्लान्स केले बंद; पाहा यादी

एअरटेनंतर आता रिलायन्स जिओने ग्राहकांना झटका दिला असून लोकप्रिय प्रिपेड प्लान्स बंद केले आहेत. यात 3 जीबी इंटरनेट डाटा मिळणाऱ्या एका प्लानचाही समावेश आहे.

जिओने 499 रुपये. 666 रुपये आणि 888 रुपयांचा प्रिपेड प्लान बंद केला आहे. 444 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दिवसाला 3 जीबी इंटरनेट डाटा मिळतो. याचा कालावधी 28 दिवसांसाठी आहे. यासह 2 जीबी इंटरनेट डाटाचा 666 रुपयांचा आणि 888 रुपयांचा प्लान देखील कंपनीने बंद केला आहे.

666 रुपयांच्या प्लानचा कालावधी हा 56 दिवसांचा तर 888 रुपयांच्या प्लानचा कालावधी 84 दिवसांचा होता. यात 2 जीबी इंटरनेट डाटासह अनलिमिटेड फोन कॉल्स आणि दिवसाला 100 एसएमएस मोफत ही सुविधा ग्राहकाला मिळत होती. मात्र सध्या हे प्लान कंपनीच्या वेबसाईटवर दिसत नाही. ‘इंडिया टूडे’ने याबाबत माहिती दिली आहे.

 

दरम्यान, कंपनीने नुकतीच आपल्या प्रिपेड प्लानच्या शुल्कांमध्ये वाढ केली होती. कंपनीने प्रिपेड प्लानमध्ये जवळपास 15 ते 20 टक्के वाढ केली होती. त्यामुळे 555 रुपयांचा प्लान 666 रुपयांना झाला. यात ग्राहकाला दीड जीबी डाटा मिळतो. तसेच सध्या जीओचे दिवसाला 3 जीबी डाटा देणारे 4 प्लान अॅक्टिव्ह आहेत. या प्लानची किंमत 419, 601 आणि 1119 आणि 4199 रुपये आहेत.

पहिले दोन प्लान 28 दिवसांच्या कालावधीसाठी मिळतात. 601 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकाला Disney+ Hotstar Mobile बेनिफिटही मिळतो. तर 1199 रुपयांच्या प्लानची वैधता 84 दिवसांची, तर 4199 रुपयांच्य प्लानची वैधता 365 दिवसांची आहे. यात जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही देण्यात येते.

 

दरम्यान, एअरटेलने याआदी 3 जीबी डाटाचे प्लान बंद केले होते. कंपनीने 398 रुपये, 499 रुपये आणि 558 रुपयांचा प्लान बंद केला होता.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: